टेक -तंत्रताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

निगडीतील एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये “आंतरराष्ट्रीय ब्रेड डे” उत्साहात साजरा

उत्तम ब्रेड्स सोबतच कल्पक मांडणीमुळे हा ब्रेड डिस्प्ले खूपच लक्षवेधक ठरला

पिंपरी : ‘आंतरराष्ट्रीय ब्रेड डे’ चे औचित्य साधून निगडीतील एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधील विद्यार्थ्यांनी जगातल्या वेगवेगळ्या देशांतील पन्नासहून अधिक नाविन्यपूर्ण ब्रेड्स बनवून त्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. पिता ब्रेड, ब्रिओश, मशरूम ब्रेड, मल्टी ग्रेन ब्रेड, स्पिनाच स्किल्लेट्स, फोकॅशिया असे वैविध्यपूर्ण ब्रेडचे प्रकार विद्यार्थ्यांनी बनवले होते. अतिशय उत्तम ब्रेड्स सोबतच कल्पक मांडणीमुळे हा ब्रेड डिस्प्ले खूपच लक्षवेधक ठरला व सर्व उपस्थितांच्या पसंतीस उतरला.

याप्रसंगी नोव्हेल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले की, असे कलात्मक आणि गुणात्मक उपक्रम हे नेहमीच एनआयबीआर कॉलेजचे वैशिष्ठ्य राहिले आहे. आणि त्यामुळेच येथील विद्यार्थी जागतिक पातळीवर हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात यशस्वी होऊन कॉलेजचे आणि त्यांच्या पालकांचेही नाव उज्वल करत असून भविष्यात सुध्दा करत राहतील. एवढ्या लहान वयात ह्या विद्यार्थ्यांनी अविरत परिश्रम घेऊन जे वेगवेगळे ब्रेड आणि रोल्स बनविले, त्याचा उपयोग त्यांना भविष्यात यशस्वी उद्योजक बनण्यासाठी नक्कीच होईल, असा विश्वास संस्थेचे विश्वस्त विलास जेऊरकर यांनी व्यक्त केला.

हा ब्रेड डे यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थी गेले दहा दिवस प्रा. यशवंत सटाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली अविरत मेहनत घेत होते. या ब्रेड डे चे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सॉल्ट डो पासून बनविलेली खेळणी व प्राणी यांचे आकर्षक डिझाईन्स व तितकीच उत्कृष्ट सजावट हे ठरले.

ह्या कार्यक्रमास उपस्थित राहुन माजी नगरसेविक अनुराधा गोरखे, वैशाली खाड्ये, संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. प्रिया गोरखे, आणि विश्वस्त समीर जेऊरकर यांनी सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंदास शुभेच्छा दिल्या. कॉलेजचे प्राचार्य डॉ. वैभव फंड यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत सर्व मान्यवरांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button