breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली – कोरोनाने देशभरात थैमान घातलेलं पहायला मिळत आहे. महमारीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला. अशातच भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला घरात होम क्वारंटाईन करून घेतलं आहे.

फ्लाइंग सिख नावानं प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंह यांचं वय 91 वर्ष आहे. मिल्खा सिंह यांच्या कुकला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर मिल्खा सिंह यांनी घरातील सर्वांची कोरोना चाचणी करून घेतली. मात्र यामध्ये मिल्खा सिंह यांच्याच चाचणीचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे मिल्खा सिंह हे हैराण झाले असल्याचं त्यांनी सांगितलं.

मला कोरोनाची लस घेण्याची गरज वाटत नव्हती. पण आता जाणीव झाली की ती घेतली पाहिजे आणि अन्य सर्वांनी देखील ती लवकर घ्यावी. संपूर्ण देशातील चाहत्याचे प्रेम आणि प्रार्थनेमुळे मी लवकर बरा होईल, असं मिल्खा सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, मिल्खा सिंग यांनी 1960च्या रोम ऑलिंपिकमध्ये 400 मीटर फायनलमध्ये चौथ्ये स्थान मिळवले होते. तर 1958 आणि 1962 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळवलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button