TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

हिवाळ्यात ‘या’ फळाचे दूध दिवसभर त्वचा ठेवेल चमकदार, कोरड्या त्वचेवर भारी उपाय

आपला चेहरा चांगला असेल तर तुम्ही अधिक खुलून दिसता. हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असते. जर चेहऱ्याची त्वच्या कोरडी  झाली तर ते वाईट दिसते. प्रत्येकालाच आपला चेहरा चांगला आणि चमकदार हवा असतो, यासाठी अनेक लोक अनेक महागड्या उत्पादनांवर किती पैसे खर्च करतात. मात्र, त्यांना हे अनेकांना माहीत नसते की, ही केमिकल युक्त उत्पादने तुमचा खिसा तर सोडाच पण तुमच्या त्वचेचेही नुकसान करतात. म्हणूनच चेहऱ्यावर अधिकाधिक नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. हे स्वस्त आहे आणि तुमच्या चेहऱ्याला हानी पोहोचवत नाही. चेहऱ्यावर खोबरेल तेल लावण्याचे अनेक फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का नारळाचे दूध देखील चांगला उपाय आहे. याच्या वापराने त्वचेला अनेक फायदे मिळतात. याबद्दल अधिक जाणून घ्या.

पिंपल्स कमी होण्यास मोठी मदत 

नारळाचे दूध त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. त्यामुळे रोज चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स कमी होण्यास मदत होते. नारळाच्या दुधात अनेक पोषक घटक असतात, त्यामुळे एक्जिमा, सोरायसिस यांसारख्या त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासही ते उपयुक्त आहे.

मेकअप काढण्यासाठी…

चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा मेकअप रिमूव्हर म्हणून देखील करु शकता. आजकाल लोक मेकअप रिमूव्हर वापरतात, परंतु जर तुम्हाला मेकअप काढण्यासाठी नैसर्गिक काहीतरी वापरायचे असेल तर तुम्ही नारळाचे दूध वापरू शकता. मेकअप व्यवस्थित काढून त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत होते.

त्वचा चमकदार करण्यासाठी

काळी वर्तुळे कमी होऊन त्वचा चमकदार बनवते. नारळाच्या दुधात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते. हे जीवनसत्त्वे चेहऱ्यावरील डाग आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. जर तुम्हाला डार्क सर्कलची समस्या असेल तर दररोज नारळाच्या दुधाने चेहऱ्याची मालिश करा. असे केल्याने चेहऱ्यावरील डार्क सर्कलची समस्याही दूर होईल. याशिवाय ते लावल्याने त्वचेवर चमकही येते. 

या वेळी लावल्याने चांगला परिणाम

जरी नारळाचे दूध चेहऱ्यावर कधीही लावले जाऊ शकते, परंतु जर तुम्ही ते रात्री झोपण्यापूर्वी लावले तर ते त्वचेवर चांगले परिणाम देते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button