breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभा निवडणूक लढवणार? माजी खासदार म्हणाले..

पुणे : भाजप खासदार गिरीष बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवार असतील अशी चर्चा आहे. दरम्यान, भाजपाचे माजी खासदार अंकुश काकडे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहीत पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

अंकुश काकडे यांनी पत्रात म्हटलं की, जेव्हा तुम्ही गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवली तेव्हा त्या राज्यात ९० ते १०० टक्के भाजपाला यश मिळाले. पुण्यात तुमचा विजय १०० टक्के असून राज्यातही ९० ते १०० टक्के भाजपाचे असेल.

हेही वाचा – LPG गॅस सलग दुसऱ्यांदा स्वस्त, पहा तुमच्या शहरातील नवे दर?

दरम्यान, केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबर या पाच दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. एक देश एक निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील अशी चर्चा आहे. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button