breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महावितरण आणि महापालिका यांच्या कलगीतुऱ्यामध्ये सामान्य नागरिकाचे जीवन धोक्यात’; इम्रान शेख

उघड्या ट्रान्सफॉर्मर डीपी जवळ अग्नी रोधक यंत्र व वाळू मातीच्या बकेट बसवण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील ट्रांसफार्मर डीपी यांना आग लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले असून,आधीही शहरात ट्रांसफार्मर डीपीला आग लागल्यामुळे काही लोकांना जीव गमवावा लागला असल्याच्या घटना घडल्या असून. महापालिका आणि महावितरण या दोन्ही संस्था कर भरणाऱ्या नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी केला.

अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने एक निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना इम्रान शेख म्हणाले, पिंपरी चिंचवड हे शहर “स्मार्ट सिटी”असल्याचं एकीकडे महापालिका मिरवत असताना दुसरीकडे शहरात मोठ्या संख्येने उघड्यावर ट्रांसफार्मर्स विद्युत रोहीयंत्र असून दर चार-पाच दिवसांमध्ये शहरात कुठे ना कुठे हे रोहियंत्र ट्रांसफार्मर्स यांना आग लागल्याच्या बातम्या कानावर येतात.कित्येक वेळेस नागरिक जखमी होतात त्यांना विजेचा धक्का बसतो किंवा आगीने होरपळले जातात.जेव्हा ही घटना घडते तेव्हा अपघात स्थळी कोणतीही सुरक्षा यंत्रणा उपलब्ध नसते. जो पर्यंत महावितरण किंवा महापालिकेचे अधिकारी येत नाही तोपर्यंत नागरिकांना मदत करता येत नाही. विद्युत कायदा व ग्राहक सुरक्षा अधिनियम 2003/10 नुसार मानकांचे पालन केले नसल्यामुळे यासारख्या घटना घडत असून. महापालिका महावितरण कडे बोट दाखवते आणि महावितरण महापालिकेकडे बोट दाखवते.

हेही वाचा – पालकांनी, मुलांमध्ये जबाबदारीचे भान निर्माण करावे! 

रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या डीपी कोणत्याही प्रकारचे झाकण न लावता अक्षरशः उघड्या पडल्या असल्याने लहान मुलांचा वा मोठ्या व्यक्तींचाही जाता-येता त्याला धक्का लागू शकतो.खांबाला लावलेल्या या डीपीमधील वीजप्रवाह उच्च दाबाचा असल्यामुळे थोडासा स्पर्श झाला तर जीवघेणा अपघात होऊ शकतो.ही बाब धोकादायक असूनही संबंधित अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असे इम्रान शेख म्हणाले.

महावितरण आणि महापालिका यांच्या कलगीतुऱ्यामध्ये सामान्य नागरिकाचे जीवन धोक्यात आले असून लवकरात लवकर सुरक्षा मानकांचे पालन करून विद्युत रोहीयंत्र ट्रांसफार्मर जवळ अग्नीरोधक यंत्र व वाळू मातीच्या बकेट बसवणे अनिवार्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने करत आहोत.जर याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर महापालिका आणि महावितरण यांच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभा करण्याचा इशारा विशाल क्षीरसागर यांनी दिला.

यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महावितरण अधिकारी आणि महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक लावण्याचे आश्वासन दिले असून लवकरच याच्यावर उपाय काढले जातील असे आश्वासन दिले.

यावेळी युवक काँग्रेसचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल क्षीरसागर,ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव, युवक जिल्हा सरचिटणीस मेघराज लोखंडे,शिवम सातपुते,शहर सचिव रजनीकांत गायकवाड,इक्बाल शेख,सचिन चालवासी व इतर युवक पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button