TOP NewsUncategorizedटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

IIT मुंबईच्या विद्यार्थ्याची सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

मुंबई : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईमध्ये शिकणाऱ्या दर्शन सोळंकी या १८ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी आत्महत्या केली. तो गुजरातमधील अहमदाबाद येथील असून तो आयआयटीमध्ये प्रथम वर्षाच्या रासायनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने सकाळी साडेअकरा वाजता सातव्या मजल्यावरून उडी मारली होती. सहामाही परीक्षा दोन दिवसांपूर्वी संपल्या होत्या.

प्रथमदर्शनी असे दिसते की दर्शन मानसिक नैराश्यात होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे. परीक्षेमुळे त्याने आत्महत्या केली का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. तरी सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विजय कांबळे तपास करत आहेत. एसएसपी बुधन सावंत म्हणाले की, प्राथमिक माहितीच्या आधारे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button