breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महिलांना दिशा अन् मार्गदर्शन मिळाल्यास नव्या उद्योग क्रांतीस सुरुवात होईल : कविता भोंगाळे- कडू

  • महिला कला, कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन
  • भाजपा महिला मोर्चा आणि गायत्री सखी मंचचा पुढाकार

पिंपरी | प्रतिनिधी

प्रत्येक महिलेमध्ये कौशल्यपूर्ण गृहिणी, कुशल संघटक आणि कोणतीही जबाबदारी पार पाडण्याची क्षमता असलेली उद्योजिका असते. केवळ त्यांना दिशा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. हे मिळाल्यास प्रत्येक महिलेत असणाऱ्या उद्योजिकेस प्रोत्साहन मिळेल आणि एका नव्या उद्योग क्रांतीस सुरुवात होईल, असे मत गायत्री सखी मंच अध्यक्षा व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या कविता भोंगाळे – कडू यांनी व्यक्त केले.

गायत्री सखी मंच व भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा, यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ मित्र मंडळ, भोसरी या ठिकाणी भोसरी परिसरातील महिला भगिनी करीता महिला कला, कौशल्य विकास मार्गदर्शन कार्यक्रमाचे ” आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भोंगाळे म्हणाल्या की,

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील अनेक महिलांमध्ये विविध सुप्त कलागुण आहेत. त्यांना दिशा व मार्गदर्शन मिळाल्यास प्रत्येक महिलेत असणाऱ्या उद्योजिकेस प्रोत्साहन मिळेल व एका नव्या उद्योग क्रांतीस सुरुवात होईल.

या कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विभागाचे मार्गदर्शक मनोज मडीगेरी यांनी उपस्थित महिलांना बचतगट त्याची रचना, त्याचे कार्य बचतगटाकरीता असलेल्या विविध शासकीय योजना व त्यांचे लाभ इत्यादींची सखोल माहीती दिली. लघु गृह उद्योग, ग्रामीण उद्योगअर्थ सहाय्य विपणन, व्यवसाय कौशल्य आदींबाबत उपस्थित महिलांना तृप्ती रामाने, अनिता डफळ यांनी मार्गदर्शन केले.

शासनाने सुरू केलेल्या सर्व योजना या महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच तयार केल्या आहेत, तिच्यातील लाभांवर सर्व महिलांचा अधिकार आहे. ते लाभ त्यांच्या पर्यंत पोहोचणे क्रमप्राप्त आहे. मात्र उदासीन प्रशासन व समाज, महिलामधील निरक्षरता आदी बाबींमुळे समाजातील बहुतांश महिला या लाभांपासून वंचित राहतात हे होऊ नये, यासाठी पुढाकार घेणार असल्याचे भोंगाळे यावेळी म्हणाल्या आहेत.

  • … तर महिलांचे जीवन समृद्ध होईल!

महिलांना शासकीय योजनांचा व मार्गदर्शनाचा लाभ मिळाल्यास त्या त्यांचे आर्थिक जीवन अधिकाधिक समृद्ध करू शकतात. परिणामी त्यांचे राहणीमान उंचावू शकते, प्रत्येक महिला स्वावलंबी होवू शकते. या करिताच आजच्या या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन भोसरी परिसरातील महिलांकरीता करण्यात आले असल्यचे मतही कविता भोंगाळे- कडू यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button