breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘मला राज्यातून काढलं तर मी…’; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा

Manoj Jarange Patil : “मला राज्यातून काढलं तर मी लई शहाणा आहे. इकडले मराठे तिकडल्या राज्यात बोलवून मोर्चे काढेन. जेलातले सगळे मराठे कैदी एकत्र करून मोर्चा काढीन. पण समाजाशी गद्दारी करणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेलमध्ये टाकाल. पण 6 कोटी मराठ्यांचं काय करणार राजकारणात हलक्यात घेऊ नका. सगळ्यांची टांगे पलटी करेन. आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिला.

“मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही, असं षडयंत्र होतं. काही लोकांचं म्हणणं होतं की, मी जातीवाद करतोय. मराठा-ओबीसी वाद होतोय. माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की, मी ओबीसींना दुखावलं. मी गावखेड्यातल्या ओबीसी बांधवांना आतापर्यंत दुखावलं नाही. जातीवाद केला कुणी? तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे? मी 13 तारखेच्या मतदानापर्यंत चांगला होतो. 13 तारीख झाली. मतदान संपलं. मग गुरगुर सुरू झाली”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

हेही वाचा – ‘अब की बार 400 पार’, भाजपच्या घोषणेमागचे पक्षाच्या नेत्याने गुपित केले उघड

“महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे. 1 महिना शांत राहा, काही जण म्हटले निवडणूक झाल्यावर बघू. त्यांचेच लोक त्यांना पाडणार आहेत. कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा. एक महिना बघू. शेवटी नर्ड्याला लागल्यावर आहेच आम्ही, तुमच्यावर जर वेळ आली तर स्व:तचं संरक्षण करा. त्या जातीचा त्यांचा नेता कधीच निवडूण येऊ द्यायचं नाही. वेळ जर आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण पाडल्याशिवाय राहायचं नाही. ज्या जातीचा नेता मराठा विरोधी भूमिका घेईल त्याला निवडून येऊ द्यायचं नाही”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी

“क्रांती मोर्चे शांततेत होते. आम्हाला जातीवादी म्हणता प्रतीमोर्चे काढले कुणी? त्याचं सोडून द्या. कुठे दिसतोय का? आपल्या नादी लागल्यावर कुठचं दिसत नाही. समाजाने काय करायचं नाही. काय करायचं हे फायनल ठरलं. कुणी कुणावर टीका करायची नाही. निकाल लागल्यानंतर कुणाचाच जयजयकार करायच नाही. एकजूट फुटू देऊ नका. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही म्हणत होते मिळालं की नाही?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

“मला म्हणायचे ओबीसीतून आरक्षण मागितलं तर दंगली होतील. इथून मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यामूळे दंगली झाल्या नाहीत. मराठ्यांच्या शेकडो वर्षांच्या नोंदी आहेत. भारतात सर्वात जुना ओबीसी मराठा आहे. आमच्या नोंदी राहून तुम्ही ओबीसीत येऊ नका म्हणता. ओबीसी महामंडळ एकट्याने 80 टक्के खालं त्याने”, असं मनोज जरांगे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button