TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

स्पर्धेत टीकायचे असेल तर, कामामध्ये सतत सुधारणा आवश्यक : शिल्पा छाब्रिया

पिंपरी : क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या वतीने भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटरमध्ये 37 वा अ‍ॅन्युवल कन्व्हेशनमध्ये 55 कंपन्यातील 180 संघातून 800 हून अधिक स्पर्धकांनी स्लोगण, पोस्टर व केस स्टडी प्रेझेन्टेशन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. विजेत्या संघांना सुवर्ण, रजत व रौप्य पारितोषिके, स्मृतीचिन्ह स्वरुपात टाटा मोटर्स लिमिटेड कार प्लॅन्टचे विभाग प्रमुख श्याम सिंग, क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, फोरमचे सचिव डॉ. अजय फुलंबरकर, कोषाध्यक्ष संजीव शिंदे, परिषद सदस्य प्रकाश यार्दी, परवीन तरफदार, धनंजय वाघोलीकर, भूपेश माल यांच्या हस्ते विजेत्या संघांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळच्या सत्रात थिसेनकृ्रप इंडस्ट्रिज इंडियाच्या मनुष्यबळ विभागाच्या संचालिका शिल्पा छाब्रिया, टाटा अ‍ॅटोकॉम्प सिस्टीम्स् लिमिटेड कंपनीचे अभिषेक जैन, फोरमच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदूलकर आदी उपस्थितीत करण्यात आले. तसेच यावेळी परिवर्तन या मासिकेचे प्रकाशन करण्यात आले. शिल्पा छाब्रिया स्पर्धकांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, स्पर्धा ही एक अनुभव असून त्यातून आपले ज्ञान वृद्धींगत करून त्या ज्ञानाचा आपल्या कामासाठी वापर केला पाहिजे. कामात सुधारणा करण्यासाठी संस्थेतील सर्व स्तरांवरील कर्मचार्‍यांचा सहभाग महत्वाचा आहे. उत्पादनाची गुणवत्ता त्याचबरोबर इतर उत्पादनाची स्पर्धात्त्मक किंमत ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेवून गुणवत्तापूर्ण वस्तूची निर्मितीकरणे आवश्यक आहे. प्रत्येकाने काम करताना निर्माण होणार्‍या दोषामुळे कंपनीचे नुकसान होणार नाही, याबाबत जागरुक राहिले पाहिजे.
टाटा अ‍ॅटोकॉम्प सिस्टिम्स् लिमिटेड कंपनीचे उत्पादन विभागाचे अभिषेक जैन म्हणाले, कामातील गुणवत्ता ही अपघाताने येत नाही. त्यासाठभ कामात अचुकता व सातत्य महत्वाचे आहे. गुणवत्तेसंदर्भात जे कुशलतेचे ज्ञान जे ग्रहण करता त्याची कृती देखील महत्वाची असते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात फोरमच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर म्हणाल्या, फोरमद्वारे विविध कंपन्यातील कर्मचार्‍यांचा सुप्त गुणांना, आपल्या कल्पनाशक्तीला वाव स्पर्धेच्या स्वरुपात मिळतो. तांत्रिक ज्ञानाचा विकास होत असला तरी उद्योग क्षेत्रात मानसिक ताणतणाव ज्यांना जाणवत आहे. त्यांनी लेखी स्वरुपात त्यांना जाणवणारा ताणतणात फोरमध्ये घ्यावा, असे आवाहन केले.
पारितोषिके वितरण समारंभात टाटा मोटर्स लिमिटेड कार प्लॅन्टचे विभाग प्रमुख श्याम सिंग स्पर्धकांना उद्देशून म्हणाले, आज तुमच्यातील सकारात्मक उर्जा पाहुन मला विशेष आनंद होत आहे. आज औद्योगिक क्षेत्रात भारत देश जगभरात यशाच्या शिखरावर जात आहे. माझ्या मते त्यात सिंहाचा वाटा क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाचा आहे. कारण ही संस्था सर्वच स्तरावरील घटकांना गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण देत आली आहे. गुणवत्तेची कास प्रत्येकांनी स्वतः अंगिकारावी. शिस्तीचे पालन प्रथम स्वतः पासून सुरू करेन, मग इतरांना प्रवृत्त करेल, आपण जे काम करता त्याकामात सतत गुणवत्तापूर्वक सुधारणा करीत गेले तर, देशभरातील ग्राहक ‘मेड इन इंडिया’ निर्मित उत्पादीत वस्तूचीच मागणी करतील, असा मला ठाम विश्वास वाटतो.
फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे मार्गदर्शन करताना म्हणाले ‘आपला देश जागतिक बाजारपेठत अगे्रसर रहावा या दृष्टीनेच विविध कंपन्यामधून क्वॉलिटी सर्कल, टी.पी.एम., काइझेन, सिक्स सिग्मा आदी तंत्राचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपल्यातील अनेकांना याचे कौशल्य प्राप्त झाले आहे ते आपण सहकार्‍यांना शिकवून त्याचा प्रसार करावा, असे आवाहन यावेळी केले.’
स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी केले. आभार डॉ. अजय फुलंबरकर यांनी मानले. संयोजन चंद्रशेखर रुमाले, रहिम मिर्झाबेग, प्रशांत बोराटे, सुनिल वाघ यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button