TOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

‘मी खूप दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’

नागपूर : आजाराला कंटाळून एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बजाजनगरमध्ये उघडकीस आली. रामरती दिनेश शाहू (४१) रा. कैकाडी नगर झोपडपट्टी असे मृत महिलेचे नाव आहे. रामरती यांनी २ नोव्हेंबरला घरी गळफास लावला. कुटुंबीयांनी त्यांना लगेच खाली उतरवून मेडिकल रुग्णालयात भरती केले. दरम्यान, सोमवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

गळफास घेण्यापूर्वी रामरती यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात ‘माझी मुलगी खूप समजदार आहे. ती आईशिवाय राहू शकते. मी खूप दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.’ असे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button