breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

मी देखील भाजपमध्ये प्रवेश करते; उर्फीची पोस्ट व्हायरल

मुंबई : सोशल मीडियावर कायम उर्फी जावेद सध्या चर्चेत असते. उर्फी विरोधात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. मुंबईच्या रस्त्यांवर न्युडिटी पसरवण्याचा आरोप त्यांनी उर्फीवर केला आहे. या तक्रारीनंतर उर्फीही चांगलीच भडकली आहे. उर्फी देखील सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत चित्रा वाघ यांना सुनावत आहे. अशातच उर्फीनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.
उर्फीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, या त्याचं महिला आहेत. ज्या राष्ट्रवादीत असताना संजय राठोड यांच्या अटकेसाठी ओरडत होत्या. यानंतर त्यांचे पती लाच घेताना पकडले गेले, त्यामुळे त्यांनी पतीला वाचवण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर संजय राठोड आणि चित्रा वाघ हे दोघे खूप चांगले मित्र झाले. मी देखील भाजपमध्ये प्रवेश करते, मग आपण चांगले मित्र होऊ.
सोबतच, भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का ? भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे आणि हो…कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही? , असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button