breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

तौक्ते चक्रीवादळ! गुजरात सरकारची मच्छीमारांसाठी १०५ कोटींची मदत

अहमदाबाद |

तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी गुजरात सरकारने १०५ कोटींची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले. तौक्ते चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर १७ मे रोजी धडकले होते.

२२० कि.मी. प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बोटी, मासेमारीचे जाळे, ट्रॉवलर्स यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याचा तडाखा जाफ्राबाद, राजुला, शियाल बेट, नवा बंदर येथे मोठ्या प्रमाणात बसला होता. येथील मच्छीमारांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजनुसार नुकसान झालेल्या एक हजारांहून अधिक लहान मोठ्या बोटींसाठी मदत म्हणून २५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. तसेच नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या खात्यात सरकार २ हजार रुपये जमा करणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button