breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! आईस्क्रीमच्या कोनमध्ये आढळला बोटाचा तुकडा

Mumbai Ice Cream | मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मालाड पोलिसांकडून या प्रकरणात तपास करण्यात येत आहे.

मलाडमधील एका महिलेने यम्मो कंपनीचं (EMOI) आईस्क्रीम ऑनलाईन मागवले होते. पण तिने ते खायला सुरुवात करताच तिच्या समोर मानवी बोटाचा तुकडा दिसला. आईस्क्रीम कोनमध्ये बोटाचा तुकडा पाहातच ती महिला ओरडू लागली आणि बेशुद्ध पडली. काहीक्षण तिच्या कुटुंबातील लोकांनाही काहीच समजलं नाही. पण त्यांना सर्व प्रकार समजल्यानंतर तात्काळ मलाड पोलीस ठाणे गाठले.

हेही वाचा    –    Pune Metro | पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाच्या कामाला सुरूवात 

मालाड पोलिसांनी याबाबत लेखी तक्रार दाखल केली असून यम्मो आईस्क्रीम कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आईस्क्रीम कोनमध्ये आढळलेले मानवी बोट मालाड पोलिसांनी फॉरेन्सिक विभागाकडे तपासणीसाठी पाठवले असून पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button