breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नारायणगावात रचला इतिहास; पुण्यातील कीर्तनकाराचा जागतिक विक्रम

जुन्नर : कोण कशात रेकॉर्ड करेल याचा काही नेम नाही. आतापर्यंत अनेक रेकॉर्ड झालेले पाहिले किंवा अनेक रेकॉर्ड होत आहेत. मात्र वारकरी संप्रदायात किर्तनावर वर्ल्ड रेकॉर्ड झालेले कधी ऐकले आहे का? नाही ना…?, पण हे खर आहे. आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप बाजीराव महाराज बांगर यांनी सलग १२ तास २० मिनिटांचे कीर्तन करून जागतिक विक्रम केला आहे. नारायणगाव येथे त्यांनी हा विक्रम केला आहे. (bajirao maharaj bangar set a world record)

बाजीराव महाराज बांगर हे मूळचे आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी गावचे असून १२ वर्षांपासून ते कीर्तन सेवा करत आहेत. कुठलाही सराव नसताना गेली बारा वर्षापासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार ह.भ.प. बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत पावनखिंडीच्या लढाईत सतरा तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली.

the kirtankaar from pune bajirao maharaj bangar set a world record

पुण्यातील कीर्तनकाराचा जागतिक विक्रम

१७ तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन का करू शकत नाही. असा निश्चय त्यांनी केला.

नारायणगाव येथील मुक्ताई मंगल कार्यालय येथे १४ जून रोजी सकाळी नऊ वाजता तुकाराम महाराजांच्या उपदेशपर प्रकरणातील तीन चरणांचा अभंग घेत कीर्तनाला प्रारंभ केला. सलग १२ तास २० मिनिटानंतर कीर्तन संपवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले.

world-record

कीर्तनात जागतिक विक्रम

या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह २२ जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button