TOP Newsपश्चिम महाराष्ट्रपुणे

अहो आश्चर्यम ! ९ वर्षाच्या अवनीचे हृदय वयोवृद्ध व्यक्तीसारखे !!

सोलापूर । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

सोलापूरात दुर्मिळातील दुर्मिळ घटना समोर आली आहे. इथे अवघ्या ९ वर्षाच्या मुलीला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर तिची तपासणी केली असता तिचे हृदय पाहून डॉक्टरही चक्रावले. पण असं असतानाही डॉक्टरांनी चिमुरडीला जीवनदान दिले आहे.

सोलापुरातील नऊ वर्षांच्या अवनी नकाते या चिमुकलीला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी वाढल्याने हा तीव्र झटका आला होता. नऊ वर्षाच्या चिमुकलीचं हृदय वयोवृद्ध व्यक्तीसारखं असल्याने डॉक्टरदेखील चक्राहून गेले होते. अवनीच्या पालकांच्या संमतीने डॉक्टरांनी मुंबईतील रुग्णालयात बायपास सर्जरी केल्यानं तिचा जीव वाचला आहे. वैद्यकीय क्षेत्रात इतक्या कमी वयाच्या रुग्णावर बायपास सर्जरी केली जात नाही. परंतु, मुंबईतील डॉक्टरांच्या टीम ते शक्य केलं आणि अवनी नकाते हिला नवजीवन दिलं.

अवनीचं हृदय वयोवृध्द व्यक्तीसारखं…
सोलापूर जिल्ह्यातील अवनी नकाते या नऊ वर्षीय मुलीला काही दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. तिचं ह्रदय वयोवृद्ध व्यक्तीसारखं कमकुवत होतं. डॉक्टरांनी ही बाब अवनीच्या पालकांना सांगितली. त्यावर शस्त्रक्रिया केल्याशिवाय मार्ग नसल्याचेही सांगितले. अवनीच्या पालकांनी तिला तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं होतं. मुंबईतील डॉक्टरांनी देखील तिच्या अनेक चाचण्या केल्या. अवनीवर बायपास सर्जरी केल्याशिवाय पर्याय नसल्यांचे तिच्या पालकांना सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button