breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

तीळ आणि गूळ हे एकत्र खाण्यामागे काय कारण आहे? वाचा सविस्तर..

Til Gul : मकर संक्रांतीमध्ये तिळगुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तीळ आणि गूळ हे एकत्र खाण्यामागे काय कारण आहे? आणि विशेषत: हिवाळ्यात जेव्हा अनेक लोकांना सर्दी-खोकल्याचा त्रास असतो. अशा वेळी तिळगूळ खाणे फायदेशीर ठरते का? हिवाळ्यात शरीराला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उष्ण पदार्थांची आवश्यकता असते.

तीळ गुळाचे ‘हे’ आहेत फायदे 

एनर्जी बूस्ट : गूळामध्ये कर्बोदके अधिक प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत होते. तीळ हे प्रथिने समृद्ध असतात. ज्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते. हिवाळ्यात याचे सेवन केल्याने शरीराला उष्णता मिळेल.

आरोग्यासाठी फायदेशीर : तीळ आणि गूळाचे सेवन दातांच्या बळकटीसाठी फायदेशीर आहे. याशिवाय केसांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. मूत्राशयाचा त्रास असणाऱ्यांनी तीळ, दूध आणि गूळ मिसळून प्यायल्याने हा आजार कमी होतो.

हेही वाचा   –  RBIचा मोठा निर्णय! बंद झालेले बँक खाते पुन्हा सुरु करता येणार 

पोषक तत्वांनी समृद्ध : तीळ हे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यासह आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत आहे. गुळामध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

रक्तातील साखरेची पातळी : गुळात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. यामुळे साखरेची पातळी हळूहळू वाढते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गूळ फायदेशीर आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button