breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

RBIचा मोठा निर्णय! बंद झालेले बँक खाते पुन्हा सुरु करता येणार

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंद झालेल्या बँक खात्यांना पुन्हा सुरु करण्यासाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. तर ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी नियमही कडक केले आहे.

RBI च्या माहितीनुसार बंद झालेली खाते पुन्हा उघडण्यासाठी ग्राहकांना केवायसी सबमिट करावा लागणार आहे. हा केवायसी बँकेच्या कोणत्याही शाखेत सबमिट करता येईल. बंद झालेले बँक खाते पुन्हा सुरु करण्यासाठी बँका कोणतेही शुल्कआकारणार नाही.

हेही वाचा   –  Indrayani River : आळंदीतून वाहणारी इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली!

बंद झालेली खाते पुन्हा सुरु झाल्यानंतर ग्राहकांना किमान सहा महिने व्यवहार करावा लागेल तसेच त्यावर आरबीआयची कडक नजर असणार आहे. त्यामुळे ग्राहकांचे आर्थिक नुकसान होणार नाही. आरबीआयचा हा नियम १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. यामध्ये छोट्या बँकेपासून मोठ्या बँकेपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच यामध्ये बँकेने ग्राहकांच्या मुदत ठेवीकडे लक्ष द्यावे असे आरबीआयने म्हटले आहे. जर खाते पुन्हा सुरु केल्यानंतर ग्राहकाने रक्कम काढली किंवा टाकली नाही, त्या खात्यामध्ये कोणताही हस्तक्षेप केला नाही तर बँकांना त्याबाबतची माहिती द्यावी लागेल. जर खातेदाराचा मृत्यू झाला असेल त्याचा नॉमिनी शोधणे देखील बँकांचे काम आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button