Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमनोरंजन
पुनम पांडेचा जीव घेतलेला Cervical cancer म्हणजे काय? काय आहेत लक्षणे?
![What is Cervical cancer that took Poonam Pandey's life](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Poonam-Pandey-780x470.jpg)
Poonam Pandey Death | बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आली आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी पूनमचे निधन झाले. तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाल्यामुळे तिचे निधन झाल्याचे म्हटले जात आहे. गर्भाशयाचा कॅन्सर नेमका कसा होतो? त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेऊयात…
गर्भाशयाचा कॅन्सर हा ३५ ते ५५ वयाच्या महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येत आहे. तसेच जास्त प्रमाणात धुम्रपान करणे, रोगप्रतिकारशक्ती, ५ वर्षांहून जास्त काळासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करणे यामुळे हा आजार संभवत आहे.
हेही वाचा – २०२४ला पंतप्रधानपदी कोणता नेता असावा? राज ठाकरे म्हणाले..
गर्भाशयाच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?
- महिलांना मासिक पाळी आल्यानंतर किंवा लैंगिक संबंधानंतर अनियमित योनीतून रक्तस्त्राव होणे.
- पाठीच्या खाली किंवा पायात वेदना होणे
- अचानक वजन कमी होणे
- भूक कमी लागणे
- योनीतून दुर्गंधी येणे
- दोन्ही पायांना सूज येणे.