Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

थंड दूध पिल्याने काय होते? आरोग्याला फायदा होतो की तोटा? जाणून घ्या…

Health Benefits Cold Milk : दूध पिणे ही आपली रोजची सवय आहे. पण थंड दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानकारक, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. चला तर मग जाणून घेऊया यामागचे सत्य

दूध हे भारतीय घरांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे दुग्धजन्य उत्पादन आहे. प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियमने भरपूर असलेले दूध पोषणतत्त्वांचा खजिना मानले जाते. काही लोक दूध गरम पितात, तर काहींना थंड दूध पिणे अधिक आवडते. थंड दूध पिल्याने शरीराला कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया

जर तुम्हाला वारंवार पोटातील अल्सर किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल, तर थंड दूध जादुई उपायासारखे काम करते. पचनासंबंधी समस्या असतील, तर एका ग्लास थंड दुधात एक चमचा इसबगोल मिसळून पिऊ शकता. हे अ‍ॅसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करते.

ऐकायला विचित्र वाटेल, पण थंड दूध वजन कमी करण्यास मदत करू शकते. थंड दुधातील कॅल्शियम शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारते, ज्यामुळे अधिक कॅलरी बर्न होतात. एक ग्लास दूध पिल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि अनावश्यक स्नॅकिंग टाळण्यास मदत होते.

हेही वाचा –  १ मे रोजी उलगडणार स्वराज्याचा इतिहास! ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबद्दल रितेश देशमुखने दिली मोठी अपडेट

हाय बीपीचा त्रास असल्यास थंड दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. हे शरीरात वेगाने कार्य करते. थंड दूध रक्तप्रवाहासोबत फिरून तणाव वाढवणाऱ्या कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी करते. तसेच दुधातील कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे बीपी कमी करण्यास मदत करणारे पोषक घटक आहेत. त्यातील बायोॲक्टिव पेप्टाइड्सही रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास उपयोगी ठरतात.

थंड दूध इलेक्ट्रोलाइट्सने भरपूर असते, जे शरीरातील डिहायड्रेशनशी लढण्यास मदत करते. त्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि त्वचा चमकदार दिसते. थंड दूध पिण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ.

छातीत जळजळ होत असल्यास थंड दूध पिणे फायदेशीर ठरते. दुधातील भरपूर कॅल्शियम अतिरिक्त आम्ल (ॲसिड) शोषून घेण्यास मदत करते आणि आम्लनिर्मिती रोखते. त्यामुळे अ‍ॅसिडिटी आणि अ‍ॅसिड रिफ्लक्समुळे होणारी जळजळ कमी होते.

भारतीय आहार पद्धतीमध्ये दुधाला पूर्ण अन्न म्हटले गेले आहे. त्‍यामुळेचे सण, समारंभामध्ये दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

ही सर्व माहिती वाचकांपर्यंत पोहोचविणे इतकाच हेतू आहे. त्‍यामुळे प्रत्‍येकाच्या प्रकृतीनुसार आहार घेणे महत्‍वाचे आहे. त्‍यामुळे कोणत्‍याही माहितीचे अनुकरण करताना आरोग्य तज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरू शकते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button