आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराने मृत्यूचा धोका 32 टक्के कमी

मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत शाकाहारी आहाराच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते

मुंबई : प्रत्येकाला आपले शारीरिक आरोग्य हे चांगले राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करत असतो. जर आपण आपल्या आहारात जास्त शाकाहारी पदार्थ आणि कमी मांसाहारी खाल्ले तर आपण हृदयरोगाचा धोका कमी करू शकता. हे एका संशोधनात सिद्ध झाले आहे. दरम्यान इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये झालेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की मांसाहारी आहार घेणाऱ्या लोकांपेक्षा शाकाहारी आहार घेणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराने मृत्यूचा धोका हा 32 टक्के कमी झालेला आहे. कारण शाकाहारी जेवणातील फायबर आणि मिनरल्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले पोषण देत असते असे दिसून आले आहे. तर मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत शाकाहारी आहाराच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

तुम्ही जर शाकाहारी आहार घेत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण शाकाहारी जेवणात सॅच्युरेटेड फॅटही कमी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शाकाहारी आहारात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असल्याने हृदयविकारांपासूनही बचाव होतो. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील सुमारे ४५,००० लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर आधारित वर्षभराच्या संशोधनानंतर असा दावा करण्यात आला आहे की मांसाहारी आहारापेक्षा शाकाहारी आहार हृदयाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.

अमेरिकन हार्ट असोसिएशनचे यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा तुम्ही पूर्णपणे शाकाहारी आहार घेतल्यास मांसाहार या आहाराच्या तुलनेत हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो. तसेच आहारतज्ज्ञ डॉ. अलका अग्रवाल सांगतात की, शाकाहारी आहारामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. शाकाहारी आहारामुळे हृदयाचे स्नायू मजबूत राहतात. यामुळे तीव्र जळजळ कमी होते आणि हृदयरोगांपासून बचाव होतो.

हृदयरोगाची लक्षणे कोणती आहेत
नेहमी थकवा जाणवणे

श्वास घेण्यास त्रास होणे

छातीत दुखणे

अचानक घाम येणे

उलटी सारखं वाटणे

कमी किंवा उच्च रक्तदाब

अचानक हृदयाचे ठोके वेगवान वाढणे

हृदयरोग कसे टाळावे?
दररोज व्यायाम करा.

खाण्यापिण्याची काळजी घ्या.

मानसिक ताण घेऊ नका.

दर 6 महिन्यांनी लिपिड प्रोफाइल चाचणी करणे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button