शहरात शनिवारी ‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’ची लस
![Vaccines for covishield and covacin will be available at these centers in the city on Saturday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Covishield_Covaxin_Vaccines_312020_1200-1.jpg)
पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (शनिवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.
‘या’ केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस
कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, हेगडेवार जलतरण तलाव प्राधिकरण, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, किवळे, बिलजीनगर दवाखाना, बापुराव ढवळे प्रायमरी स्कुल, पुनावळे, सेक्टर नंबर 29 आठवडी बाजार शेजारी रावेत येथे लस उपलब्ध होणार आहे.
तसेच नेहरुनगर उर्दू शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, बाबाजी पांडु भांडे पिंपळेनिलख दवाखाना, महापालिका शाळा वाकड, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती, मारुती गेणू कस्पटे प्राथमिक शाळा वाकड, जुने भोसरी रुग्णालय, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना, छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली, सखुबाई गार्डन भोसरी, नवीन भोसरी रुग्णालय, स्केटिंग ग्राऊंड सेक्टर 21 यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा, प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, घरकुल दवाखाना चिखली, ठाकरे शाळा रुपीनगर, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, भानसे स्कुल यमुनानगर, नुतन शाळा ताम्हाणे वस्ती या लसीकरण केंद्रांवर लस मिळणार आहे.
यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग, कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा मंगलनगर थेरगाव, महापालिका शाळा रहाटणी, दिनदयाल शाळा पवना बँकेमागे संत तुकारामनगर पिंपरी, कासारवाडी दवाखाना, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, दापोडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी आणि बालाजी लॉन्स जुनी सांगवी या 57 केंद्रांवर कोविन अॅपवरुन बुकिंग केलेले 50 टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने 50 टक्के लाभार्थ्यांना ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत लसीकरण होणार आहे.
‘या’ ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार
ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, फकिरभाई पानसरे उर्दु शाळा चिंचवड स्टेशन, मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल यमुनानगर, जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव या 8 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.
स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस
जुने भोसरी रुग्णालय, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, यमुनानगर रुग्णालय, अण्णाभाऊ साठे माध्यमिक विद्यालय संत तुकारामनगर पिंपरी, अहिल्यादेवी होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.