शहरात आज 20 हजार जणांचे लसीकरण
![Vaccination of 20,000 people in the city today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Corona-Vaccine.jpg)
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी – चिंचवड शहरात शुक्रवारी (दि. 10) 20 हजार 125 जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. नवीन लसीकरण झाल्यामुळे शहरातील ही संख्या 16 लाख 8 हजार 793 झाली आहे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका व खासगी रुग्णालयाद्वारे हे लसीकरण करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 69 केंद्रावर लसीकरण करण्यात आले. या मध्ये कोविशिल्डचे 13 हजार 942, कोव्हॅक्सीन 1 हजार 551 जणांचे लसीकरण करण्यात आले. तर खासगी रुग्णालयाच्या 132 केंद्रावर कोविशिल्डचे 4 हजार 03, कोव्हॅक्सीनचे 77 जणांचे लसीकरण करण्यात आले. खासगी रुग्णालयात स्पुतनिक व्ही या लसीचे 252 जणांचे लसीकरण करण्यात आले. 45 वर्षांवरील 2 हजार 443 जणांचे लसीकरण झाले. 18 ते 45 मध्ये 17 हजार 286 तर हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्करच्या 396 जणांचे लसीकरण करण्यात आल्याची नोंद महापालिकेकडे आहे.