आरोग्य । लाईफस्टाईल

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवायची, तर करा ‘या’ पौष्टिक ज्यूसचे सेवन

Nutritious juice : हिवाळ्यात अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढत असतो. अशावेळी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने वारंवार संसर्गजन्य आजार होण्याचा धोका निर्माण होत असतो. त्याचबरोबर ज्यांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असते त्यांचे शरीर अनेक आजार आणि संसर्गाशी लढण्यास सक्षम असते. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असल्यास शरीरासाठी संरक्षक कवचासारखे काम देखील करते.

तुमच्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. याकरिता विशेषत: तुमच्या आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी युक्त गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही यातुम्ही या भाज्यांचा ज्यूसही करून पिऊ शकता. विशेषतः हिवाळ्याच्या हंगामात तुम्ही या भाज्या आणि फळांचा रस बनवून सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच त्वचेवर चमक आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात

हेही वाचा –  हिवाळ्यात सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळविण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? जाणून घ्या

सर्वप्रथम बीट, गाजर, आले स्वच्छ धुवून मग सोलून घ्या. त्यानंतर सोलून घेतलेले गाजर, बीट, आले त्याचबरोबर सफरचंद या सर्व गोष्टींचे बारीक तुकडे करून घ्या. बारीक तुकडे केल्यानंतर एका मिक्सर भांड्यात किंवा ज्यूसरमध्ये टाकून बारीक स्मूद ग्राइंड करून घ्या. जर मिक्सरच्या भांड्यातील रस खूप जाड दिसत असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता. गोड करायचं असेल तर त्यात मध घालू शकता. त्यानंतर एकदा पुन्हा ग्राइंड करून झाल्यानंतर एका ग्लासमध्ये रस काढून फ्रेश सर्व्ह करा. चवीसाठी तुम्ही आवळा आणि पुदिन्याची पाने यामध्ये वापरू शकता.

हेल्थलाइनच्या मते, बीट, गाजर, आले आणि सफरचंदापासून बनवलेल्या ज्यूसचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. कारण यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 9 आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटकांचा समावेश असतो. अशावेळी तुम्ही या ज्यूसचे हिवाळ्यात सेवन केल्याने त्वचा, केस आणि पचनक्रिया यासाठी फायदेशीर ठरू शकतो तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो. याला एबीसी ज्यूस म्हणून देखील ओळखले जाते.

या ज्यूसचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. अशा तऱ्हेने हिवाळ्यात जी लोकं कमी पाणी पितात. ते या ज्यूसचे सेवन करू शकतात. त्याचबरोबर तुमच्या शरीरात जर रक्ताचे प्रमाण कमी असेल तर तज्ज्ञांकडून बीट खाण्याचा सल्ला दिला जातो. अशावेळी याचे नियमित सेवन केल्यास लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते. तसेच या ज्यूसमध्ये असणारे पोषक घटक त्वचा चमकदार होण्यास मदत करतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button