TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
महाविकास आघाडीच्या मोर्चाला गांभीर्याने घेण्याची गरज नाही : खासदार राहुल शेवाळे
मुंबई : गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात जे मुद्दे होते. त्याच मुद्यांवर महाविकास आघाडी मोर्चा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या मोर्चाकडे महाराष्ट्रातील जनतेने गांभीयाने घेण्याची आश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीचा उद्या, शनिवारी महामोर्चा होणार आहे. त्यासाठी सीएसटी टर्मिनस येथे पार्किंगची व्यवस्था केली. संभाव्य वाहतूक कोंडी होवू नये. याकरिता वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे.
भाजपाच्या नेत्यांनी महामानवांचा अवमान केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीसह विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.





