breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारण

राज्यांकडे लशींच्या १.६३ कोटी मात्रा शिल्लक

नवी दिल्ली |

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांजवळ लसीकरणासाठी अद्याप लशींच्या १.६३ कोटींहून अधिक मात्रा शिल्लक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. मोफत आणि राज्यांमार्फत थेट खरेदी अशा दोन्ही श्रेणींच्या माध्यमांतून केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लशींच्या २४ कोटींहून अधिक (२४,६०,८०,९००) मात्रा दिल्या आहेत.

यापैकी वाया गेलेल्या लशी जमेस धरता लशींच्या एकूण २२,९६,९५,१९९ मात्रांचा वापर झाला आहे. एकूण १,६३,८५,७०१ मात्रा अजूनही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली. रविवारी सकाळपर्यंत देशभरात ३२,४२,५०३ सत्रांमधून लोकांना लशींच्या एकूण २३,१३,२२,४१७ मात्रा देण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button