आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

स्किनकेअर रूटींगमध्ये तांदळाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर

तांदूळ हा अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत

मुंबई : आजकाल प्रत्येकाला चमकदार आणि तेजस्वी, मुलायम त्वचा हवी असते. अशातच कोरियन ग्लास स्किन आपलीही हवी असे ट्रेंड सुरू आहेत. कारण आजकाल सोशल मिडीयावर कोरियन ड्रामा अधिक पाहिला जात आहे. त्यामुळे अनेक मुला-मुलींना त्यांच्यासारखी चमकदार नितळ त्वचा हवी असते, पण अशी स्किन मिळवण्यासाठी कोरियन लोक त्यांच्या स्किनकेअर रूटींगमध्ये तांदळाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे ही कोरियन स्किनकेअर पद्धत आता जगभरात लोकप्रिय होत आहे.

तांदूळ हा अँटीऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे, जो सुरकुत्या कमी करतो. तांदळात वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील असतात, जे तरुण त्वचा टिकवून ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का की फक्त तांदळाचे पाणीच नाही तर इतर अनेक आपले घरगुती घटक आहेत जे तुम्हाला कोरियन ग्लास स्किन मिळविण्यात मदत करू शकतात? जर तुम्हाला कमी खर्चात आणि कोणत्याही दुष्परिणामांशिवाय चमकदार त्वचा हवी असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात कोरियनसारखी त्वचा मिळविण्यासाठी वापरता येणाऱ्या काही गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

तज्ज्ञ काय म्हणतात?

सेलिब्रिटी त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की कोरियन त्वचा भारतीय त्वचेपेक्षा खूप वेगळी आहे. म्हणून तुम्ही जेव्हा तांदळाच्या पाण्याचा वापर करता तेव्हा ते दररोज लावण्याऐवजी आठवड्यातून 2-3 वेळा लावावे. तांदळाचे पाणी त्वचेला अनेक फायदे देते, जसे की त्वचा स्वच्छ करणे, डाग कमी करणे आणि ती मऊ आणि चमकदार बनवणे. अशातच मुरुमे, रंगद्रव्य किंवा संवेदनशील त्वचा असलेल्यांनी तांदळाचे पाणी वापरू नये. चला जाणून घेऊया की तुम्ही आणखी कोणत्या गोष्टींचा वापर करून चमकदार त्वचा मिळवू शकता.

कोरफड खूप प्रभावी आहे

कोरफड ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. तर कोरफड अनेक प्रकारे आपल्या रोजच्या जीवनात वापर असतो. त्यातच कोरफड जेलही चेहऱ्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. त्याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला हायड्रेट ठेवण्यास, सुरकुत्या कमी करण्यास आणि कोलेजन उत्पादन वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा नितळ आणि मऊ राहते.

काकडीने मिळवा चमकदार त्वचा

काकडी हायड्रेटिंग आणि शरीराला थंडावा देते. कोरियन स्किन केअरमध्ये देखील त्यांचा वापर केला जातो. काकडी चेहऱ्यावर लावल्याने जळजळ आणि सूज कमी होते, त्वचा हायड्रेट होते. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर काकडीचा रस देखील लावू शकता. काकडीचे फेस पॅक देखील एक चांगला पर्याय आहेत.

ग्रीन टी वापरा

कोरियन स्किन केअरमध्येही ग्रीन टीचा वापर केला जातो. त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. ते जळजळ कमी करते, लालसरपणा कमी करते आणि त्वचेला ताजेतवाने वाटते. यासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ग्रीन टी बॅग्ज लावू शकता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button