आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

वजन कमी करण्यापासून निरोगी त्वचेपर्यंत गुलाबाचा चहा फायदेशीर…

राष्ट्रीय : अनेकांच्या दिवसाची सुरूवात चहा पिण्या पासून होते. सकाळी सकाळी चहा प्यायल्यामुळे तुमच्या शरीरात दिवसभर उर्जा राहाते. परंतु तुम्हाला माहिती आहे का जास्त प्रमाणात चहा प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. गुलाबाला केवळ सौंदर्याचे प्रतीक मानले जात नाही, तर विविध पदार्थांमध्येही त्याचा वापर केला जातो. गुलाबाचा वापर मिठाई सजवण्यासाठी, गुलकंद बनवण्यासाठी आणि गुलाबाच्या कोरड्या पाकळ्यांपासून शरबत बनवण्यापर्यंत अनेक पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो.

अनेक ब्युटी प्रोडकट्समध्ये आणि क्रिम्समध्ये गुलाबाचा वापर केला जातो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? गुलाबाचे सोवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. गुलाबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, लोह आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेकजण शरीर निरोगी ठेवण्यासाठी गुलाबाच्या चहाचे सेवन करतात. गुलाबाचा चहा प्यायल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते त्यासोबतच तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

गुलाबाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे :-

वजन कमी होते : गुलाबाच्या चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी पचन सुधारण्यास मदत होते आणि चयापचय वाढवते. गुलाबाचा चहा शरीरात चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय, गुलाब चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

निरोगी त्वचा : गुलाबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला कोलेजन उत्पादन करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा घट्ट आणि तरुण दिसते. गुलाबाचा चहा मुक्त रॅडिकल्सशी लढून त्वचेचं नुकसान होण्यापासून संरक्षण करते आणि चेहऱ्यावरील डाग कमी करते. गुलाब चहाचे नियमित सेवन केल्याने त्वचेला हायड्रेट राहते आणि नैसर्गिक चमक देण्यास मदत होते.

तणाव कमी करते : गुलाब चहामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट तणाव कमी करण्यास मदत करतात. गुलाब चहाच्या सेवनामुळे मूड सुधारते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते. व्यस्त जीवनशैलीत तणावापासून दूर राहण्यासाठी गुलाब चहाचे सेवन उत्तम पर्याय ठरू शकतो.

पचनशक्ती मजबूत होते : गुलाबाच्या चहामध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म पचनसंस्था मजबूत करतात. तुम्हाला जर बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटदुखी यांसारख्या समस्या असतील तर गुलाबाचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरते.

हेही वाचा  :  महारेराकडून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना जारी 

हृदयाच्या आरोग्य : गुलाबाच्या चहामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात. गुलाबाच्या चहाचे नियमित सेवन केल्यास शरीरातील रक्तदाब नियंत्रित करते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते : गुलाबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत करते आणि शरीराला संसर्गापासून वाचवते. सर्दी-खोकला यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी दररोज गुलाबाच्या चहाचे सेवन करावे.

गुलाब चहा कसा बनवायचा :- एक कप पाणी उकळून घ्या. त्यात काही वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाका आणि झाकून 5-7 मिनिटे ठेवा. त्यानंतर चहा गरम करून गाळून प्या. तुम्ही त्यात मध किंवा लिंबाचा रस देखील घालू शकता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button