TOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

झोपेतून उठताच सतावतेय पाठ- कंबरदुखी? ‘या’ उपायांमुळे होईल क्षणात सुटका

 घड्याळाच्या काट्यावर जगणं काय असतं, हे आता जास्त प्रत्ययकारीरित्या पाहायला मिळत आहे. कारण, आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती घड्याळ्याच्याच काट्यावर धावत आहे. कुणी नोकरीसाठी (Job) तर कुणी कशासाठी. अशा या धकाधकीच्या आयुष्यात असेही काही प्रसंग येतात ज्यावेळी आपलं शरीरच उत्तर देऊ लागतं. कारण, आपण काही यंत्रमानव नाही. तासन् तास एकाच ठिकाणी बसून राहणं, किंवा एकाच ठिकाणी उभं राहणं या आणि अशा अनेक कारणांमुळे हल्ली बऱ्याचजणांना पाठ आणि कंबरदुखीचा त्रास सतावू लागतो. यामध्ये वाढतं वय हीसुद्धा एक काळजी करण्याजोगी बाब असते. तुम्हालाही हा त्रास सकाळच्या वेळी झोपेतून उठल्यानंतर पाठ आणि कंबर प्रचंड दुखते अशी तक्रार करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर यामागची कारणं सर्वप्रथम जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कारण, त्यानुसार योग्य उपाय घेऊन तुम्ही या तक्रारी दूर करु शकता. 

चुकीच्या पद्धतीनं कुशीवर झोपल्यास… 
चुकीच्या पद्धतीनं एकाच कुशीवर अर्थात एकाच बाजुला झोपल्यास पाठ आणि कंबर दुखू लागते. तुम्हालाही ही सवय असेल, तर आताच ती बदला. रात्रीच्या वेळी झोपलेलं असताना किमान 4 ते 5 वेळा शरीराची बाजू बदला. यामुळं कंबरदुखीपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

स्‍टि‍योपोरोस‍िस
कंबरेच्या सततच्या दुखण्यामुळे ऑस्‍टि‍योपोरोस‍िससुद्धा होऊ शकतो. ही एक अशी व्याधी आहे, ज्यामध्ये हाडं कमकुवत होतात. ऑस्‍टि‍योपोरोस‍िसचा त्रास तुम्हालाही असल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा. 

स्लिप डिस्क
स्लिप डिस्कमध्ये चुकीच्या पद्धतीनं हालचाल झाल्यासही सकाळ सकाळी कंबरदुखीचा त्रास सतावू शकतो. तुम्हीही या समस्येशी झगडत असाल तर, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

कॅल्शियमची कमतरता
शरीरात काही पोषक घटकांची कमतरता झाल्याससुद्धा अनेकांनाच कंबरदुखीचा त्रास सतावू लागतो. त्यातही कॅल्शियमची कमतरता अनेक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. 

कंबरदुखी आणि पाठदुखीवर उपाय काय?

कमकुवत मांसपेशींमुळे तुम्हाला कंबर अथवा पाठदुखीचा त्रास सतावत असल्यास काही सोप्या व्यायाम प्रकारांच्या मदतीनं तुम्ही या त्रासाला दूर ठेवू शकता. पण, एखादा आजार किंवा शारीरिक व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच असे निर्णय घ्यावेत. योगासनांमधील काही आसनं या दुखण्यांवर रामबाण उपाय ठरतात. यामध्ये पवनमुक्तासन, बंधासन, भुजंगासन किंवा नौकासन यांचा समावेश आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button