Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
अभिनव रावेत सोशल फाऊंडेशनच्या मार्फत घेतलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
![Organizing blood donation camp through Abhinav Ravet Social Foundation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/WhatsApp-Image-2021-05-16-at-9.13.18-PM.jpeg)
पिंपरी |
वेळेची गरज आणि सामाजिक भान लक्षात घेता अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन यांच्या मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५३ तरूणांनी उत्सफुर्त प्रतिसाद दर्शवत रक्तदान केले. रक्तदान शिबीराचे आयोजन मनसे युवानेते प्रविण माळी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.शिबीराचे उद्धघाटन युवानेते योगेश शिंदे आणि मनसे शाखाध्यक्ष ऋषिकेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. शिबीराचे अनिकेत साळुंखे ,मनसे शाखाध्यक्ष चेतन लिम्हण ,ओंकार शिंगटे माऊली गव्हाडे यांनी संयोजन केले. शिबीरास संजीवनी ब्लड बँक यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
![Organizing blood donation camp through Abhinav Ravet Social Foundation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/WhatsApp-Image-2021-05-16-at-9.13.18-PM-300x169.jpeg)
वाचा- ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?’- आमदार रोहित पवार