आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई

कांदा केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

कांद्याचे तेल लावल्यामुळे केसांची निरोगी वाढ

मुंबई : कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी त्याच्या मध्ये कांदा आणि मसल्यांचा वापर केला जातो. कांद्यामुळे पदार्थाची चव वाढते त्यासोबतच तुमच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरते. कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर अढळते ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. कांदा तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जाते. कांद्याच्या वापरामुळे तुमच्या केसांसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. तुम्हाला जर केसगळती किंवा कोंड्याच्या समस्या असतील तर कांद्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

केसगळतीच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही कांद्याच्या तेलाचा वापर करू शकता. कांद्याचे तेल लावल्यामुळे तुमच्या केसांची निरोगी वाढ होते. कांद्याच्या तेलाचा वापर केल्यामुळे केसांमधील कोंडा निघून जाण्यास मदत करते. तुमचे केस जर फ्रिजी आणि ड्राय झाले असतील तर तुम्ही केसांवर कांद्याचे तेल लावणे फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया कांद्याच्या तेलाचे फायदे आणि कांद्याचे तेल घरच्या घरी कांद्याचे तेल कसे बनवायचे?

डोक्यातील कोंडा कमी होतो – कांद्यामधील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची स्कॅल्प स्वच्छ होते आणि कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

केसांना नैसर्गिक चमक – कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केस अधिक चमकदार आणि गुळगुळीक होण्यास मदत होते. कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केसांचे आरोग्य निरोगी होण्यास मदत करते. शॅम्पू करण्यापूर्वी केसांना कांद्याचा रस लावणे फायदेशीर ठरेल.

केसांची निरोगी वाढ – कांद्याचा रस केसांवर लावल्यामुळे टाळूमध्ये रक्तप्रवाह वाढते आणि केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच केस घणदाट होण्यास मदत होते.

काळे केस – तुमचे केस अगदी कमी वयात पांधरे असतील तर तुम्ही केसांवर कांद्याचा रस लावू शकता, त्यामधील अँटिऑक्सिडेंट्स केस काळे करण्यास मदत करतात.

हेही वाचा –  १० लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त होणारबजेटमध्ये केंद्र सरकार डबल गिफ्ट देण्याच्या तयारीत

घरच्या घरी कांद्याचे तेल कसे बनवायचे जाणून घ्या

सर्व प्रथम कांदा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. तयार पेस्ट चाळणीतून किंवा कपड्यातून गाळून घ्या आणि नंतर कांद्याचा रस खोबरेल तेलात मिसळा आणि 15-20 मिनिटे चांगले उकळा. तेल थंड झाल्यावर केसांवर मसाज करा. कांद्याचे तेल तुमच्या केसांच्या निगा राखण्याच्या आणि केसगळतीच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरेल आणि केसांना जाड आणि घणदाट होण्यास मदत होते. कांद्याचे तेल तुमच्या केसांवर 1 ते 2 वेळा मसाज केल्यामुळे फायदे होतील. कांद्याचे केस धुण्यापूर्वी 1-2 तास ठेवा आणि नंतर शैम्पूने धुवा. तेलकट स्कॅल्प असलेल्या लोकांनी कांद्याच्या तेलाचा वापर करू नये.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button