Nipah Virus आला महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट
![Nipah Virus has reached Maharashtra's doorstep, Karnataka has issued an alert](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Nipah-Virus-780x470.jpg)
Nipah Virus : केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. असं असतानाच आता निपाहची दहशत महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर म्हणजेच कर्नाटकपर्यंत पोहोचली आहे. कर्नाटकमध्येही निपाहचं संकटाची चाहूल लागली असल्याने राज्य सरकारने अलर्ट जारी केला आहे.
केरळमधील निपाह रुग्णांची संख्या पाहून कर्नाटक सरकारने एक पत्रक जारी केलं आहे. जनतेनं केरळमधील निपाह प्रभावित भागांमध्ये गरज नसताना प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. कर्नाटकच्या आरोग्य विभागाने केरळच्या सीमा भागातील जिल्ह्यांना म्हणजेच कोडागु, दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि मैसूरमध्ये अलर्ट जारी केला आहे. कर्नाटकमधून केरळमध्ये प्रवेश करणाऱ्या टोल नाक्यांवरील तपासणी वाढवण्यात आली आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, राऊत आले नाहीत का?
केरळमधील कोझिकोड जिल्ह्यामधील निपाह विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शिक्षण संस्था आणि क्लासेसला १६ सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र विद्यापीठांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. निपाह संसर्ग झालेल्यांवर उपचार करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर वापरलं जाणारं ‘मनोक्लोनक अॅण्टीबॉडी’ हे डोस इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून केरळमध्ये पाठवण्यात आलं आहे.