आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नखांच्या रंगावरून आजार ओळखता येतो!

नखांमधील बदल आपल्या आरोग्याशी कसे संबंधित

महाराष्ट्र : आपण आजारी आहोत की निरोगी आहोत हे ओळखण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यावरून आपण आपला आजार ओळखू शकतो. पण नखांच्या रंगावरूनही आजार ओळखता येतो हे तुम्हाला माहीत आहे का? नखांवरून आपला आजार समजू शकतो. कधी कधी आपली नखं तुटू लागतात. नखं वाढल्यावर ती कमकुवत होतात आणि तुटू लागतात. पुरुष आणि महिला या दोघांमध्येही ही समस्या असते. हवामानातील काही बदलांमुळेही ही समस्या होऊ शकते. कधीकधी आपल्या शरीरात होणारे बदल आणि आहारातील अपुरेपणामुळे नखांच्या रूपांतरणाचे कारण असू शकते. शरीराला आवश्यक पोषणतत्त्वे मिळत नसल्यास त्याचे परिणाम नखांवर दिसू लागतात. नखांमधील बदल आणि ते आपल्या आरोग्याशी कसे संबंधित आहेत, ते पाहूया.

पातळ आणि मऊ नखं
समान्यपणे बहुतेकांची नखं पातळ आणि मऊ असतात. मऊ आणि पातळ नखं तुटण्याची शक्यता अधिक असते. व्हिटॅमिन बीच्या कमतरतेमुळे ही नखं पातळ होतात. आपल्या शरीरात कॅल्शियम, लोह, आणि फॅटी ऍसिड्स यांचा तुटवडा देखील असू शकतो. त्यामुळेही नखं पातळ आणि मऊ होतात आणि ती तुटू लागतात.

पांढरे डाग
नखांवर असणारे पांढरे डाग “ल्यूकोनिचिया” (leukonychia) म्हणून ओळखले जातात. नखांवर पांढरे डाग आल्यास नवीन कपडे मिळतील असं सांगितलं जातं. परंतु प्रत्यक्षात ते फक्त डाग नाहीत, तर तो आपल्या आरोग्याशी संबंधित महत्त्वपूर्ण इशारा असतो. नखांवरील पांढरे डाग झिंकच्या तुटवड्यामुळे किंवा फंगल इन्फेक्शनचे लक्षण असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. काही वेळा शरीरातील ऍलर्जीमुळेही पांढरे डाग दिसतात.

पिवळी नखं
पिवळी नखं सामान्यतः दिसतात. अत्यधिक धूम्रपानामुळे कधीकधी नखांना पिवळा रंग येतो. याशिवाय, हे फंगल इन्फेक्शन, श्वासविकार, रुमॅटोइड आर्थ्रायटिस किंवा थायरॉइड विकार दर्शवतात. पिवळी नखं असतील तर हे आजार आहेत असं समजायचं. नखांमध्ये पिवळा रंग येणं हा मधुमेह असू शकतो. त्यामुळे योग्यवेळी आरोग्य चाचणी करणं योग्य आहे.

चमच्याच्या आकाराची नखं
काहींची नखं चमच्यासारखी दिसतात. सामान्यपणे ही नखं वळलेली, म्हणजेच चमच्यासारखी होतात. तुमची नखं अशी असतील तर ते लो हेमोग्लोबिन, हायपोथायरॉइडीझम किंवा लिव्हर प्रॉब्लेम्स यांचे लक्षण असू शकतात. ही स्थिती सुधारण्यासाठी लोहयुक्त आहार घेतला पाहिजे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button