ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उत्तरोत्तर रंगत गेलेला प्रभात कल्चरलचा २१ वा संगीत महोत्सव थाटात

निगडी येथे कला क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव : भानुप्रताप बर्गे यांची उपस्थिती

पिंपरी-चिंचवड : प्रभात कल्चरल फाऊंडेशन व नंदकिशोर कल्चरल अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने २१ वा वार्षिक संगीत महोत्सव निगडी येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिपप्रज्वलन प्रविण पोकरणा, अजिज सय्यद व अनिल देशपांडे यांच्या हस्ते झाला. अजिज सय्यद यांनी मनोगत व्यक्त करताना ख्यातनाम क्लेरोनेट वादक आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्रीयुत बाबुमियाँ बँडवाले यांचे कार्य प्रेक्षकांसमोर मांडले.

यानंतर चिंतामणी नातू यांचे धृ्रपद गायन झाले., गायनानंतर पुरस्कार वितरण करण्यात आले. अनिल देशपांडे यांना पुरस्कार देवून त्यांचा सत्कार प्रविण पोकरणा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर अंजली शिंगडे राव (व्हायोलिन वादक) यांचा पुरस्कार देवून भानुप्रताप बर्गे (एसीपी) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, सुरेश फडतरे (हार्मोनियम वादक) यांचा पुरस्कार देवून भानुप्रताप बर्गे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी अंजली शिंगडे राव (व्हायोलिन वादक) व सुरेश फडतरे (हार्मोनियम वादक) यांची जुगलबंदी झाली. त्यांनी राग मधुवंती सादर केला त्यांना (तबला वादक) रमाकांत राऊत यांनी साथसंगत दिली. तसेच, अभंगाच्या विविध छटांचे सादरीकरण केले. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे भानुप्रताप बर्गे (एसीपी), प्रविण पोकरणा, अजिज सय्यद, अभय पोकरणा, चिंतामणी नातू, अनिल देशपांडे यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे खजिनदार विठ्ठल मोरे यांनी आपल्या सुंदर निवेदनाने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता व आभार प्रदर्शन अध्यक्ष शाहरूख सय्यद यांनी केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button