गेल्या 24 तासांत 10,302 नवे कोरोना रुग्ण, 11,787 जणांना डिस्चार्ज
![In the last 24 hours 10,302 new corona patients, 11,787 discharged](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/383720-corona-logo-2.jpg)
पुणे | गेल्या 24 तासांत देशभरात 10 हजार 302 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 11 हजार 787 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात सध्या 1 लाख 24 हजार 868 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 44 लाख 99 हजार 925 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 39 लाख 09 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.28 टक्के एवढा झाला आहे.शात गेल्या 24 तासांत 267 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 65 हजार 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 63.05 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 10.72 लाख नमूने तपासण्यात आले आहेत.कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 115.79 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे.