जीवनात स्वतःला ‘या’ ६ गोष्टींची शिस्त लावून घेतली तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल..
![If you discipline yourself with these 6 things in life, you will surely succeed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/discipline-780x470.jpg)
लाईफ ऑडिट
स्वतःचं निरीक्षण करा. तुम्ही तुमची जी ओळख निर्माण करत आहात त्याकडे नीट लक्ष द्या. तुमच्या ध्येयाविषयी फक्त विचार नाही तर कृती हवी. तुम्हाला जशी व्यक्ती बनायचे आहे त्याविषयी विचार करा. जसे तुम्हाला बनायचे आहे तसा विचार केल्याने तुम्हाला त्यादृष्टीने कृती करण्यास मदत मिळते.
रिमाइंडर्स लावा
आपल्याला काय करायचे आहे हे विसरले जाऊ शकते. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करा. कॅलेंडर, टू डू लिस्टमध्ये रिमाइंडर्स सेट करून ठेवा.
आव्हाने स्वीकारा
सर्वात कठीण लढाई बऱ्याचदा आपल्या आतली असते. संघर्षाशिवाय काहीही अर्थपूर्ण साध्य होत नाही. गोष्टी किती कठीण आहेत याचा विचार करण्याऐवजी तुम्ही कालांतराने करत असलेल्या वाढीव प्रगतीचा विचार करा.
हेही वाचा – ‘अजितदादा यांनी सरड्यासारखा रंग बदलला’; नाना पटोलेंची खोचक टीका
स्वतःची काळजी घ्या
जेव्हा तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या चांगले वाटत नाही तेव्हा योग्य निर्णय घेतले जात नाहीत. त्यालाठी शारीरिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःची काळजी घ्या. वाचन करून मानसिक आरोग्य, व्यायामाने शारीरिक आरोग्य आणि कृतज्ञतेचा सराव करून आध्यात्मिक आरोग्य वाढवा
ध्यानाचा सराव
रोज किमान १० मिनीटे ध्यानाचा सराव करा. विचार येतात त्यांना येऊन जाऊ द्या. त्यावर पुन्हा विचार करू नका. फक्त तुम्हाला कसं वाटतंय याचा विचार करा.
चांगल्या नव्या सवयी लावून घेणे
लहान सुरुवात करणे, जबाबदारी घेणे, तुमच्या प्रगतीचा मागोवा घेणे आणि तुमचे विजय साजरे करणे या सर्व सवयी निर्माण करणे गरजेचे आहे. हेच तुमच्या यशाला मदतशीर ठरेल.