केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी टाळू स्वच्छ करणे गरजेचे
टूथब्रशने टाळू स्वच्छ करणे किती योग्य?
![Hair, health, healthy, scalp, clean, need, toothbrush, scalp, clean, proper,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/brush-780x470.jpg)
महाराष्ट्र : केस निरोगी, मजबुत आणि घनदाट असावे असे सर्वांनाच वाटते. पण यासाठी टाळू स्वच्छ असणे गरजेचे आहे. अनेक लोक महागडे शॅम्पू वापरतात किंवा कंडिशनरचा वापर करतात. पण कधी कधी टाळूवर मृत त्वचा, घाण, कोंडा जमा होते. यामुळे केस चिकट दिसतात. केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा स्वच्छ धुवावे. तसेच बाहेर जाताना स्कार्फ बांधावा. पण तुम्ही कधी टूथब्रशने टाळू स्वच्छ करण्याबद्दल ऐकले आहे का? बरं ही पद्धत किती फायदेशीर आहे? आणि याचा वापर कसा करायचा ? या सर्व प्रश्नांची उत्तर सविस्तर जाणून घेऊया.
योग्य पद्धत आहे का?
टाळू स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश वापरल्याने छिद्र आणि सेबेशियस ग्रंथी बंद होण्यास मदत होऊ शकते. हे विचित्र पद्धत असली तरी टाळू स्वच्छ करण्यास आणि रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करते. टाळूमधील घाण सहज निघण्यास मदत मिळते.यासाठी मऊ ब्रश वापरावा. जास्त जोर देऊन टाळू घासू नका, अन्यथा केसांच्या मुळा कमकुवत होऊन केस गळू शकतात.
कसा वापर करावा?
मऊ टूथब्रश घ्या आणि काही तेल किंवा सफरचंद सायडर व्हिनेगर लावा. ज्यामुळे डोक्यातील कोंडा सैल होईल आणि टाळू निरोगी राहील. या प्रक्रियेमुळे डोक्यातील रक्ताभिसरण देखील सुधारते आणि केस वाढण्यास मदत मिळते.
पुढील स्पेट करा फॉलो
1. एक मऊ टूथब्रश किंवा विशेष केस स्क्रबर वापरा. ज्यामध्ये सौम्य एक्सफोलियंट्स असतात. ते चिकट आणि फ्लॅकी जमा काढून टाकू शकतात.
2. तुमचे केस चांगल्या शॅम्पूने धुवा आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तुमच्या टाळूला हलक्या हाताने मसाज करा.
3. तुमचे केस जास्त धुणे टाळा. कारण त्यामुळे जास्त कोरडेपणा येऊ शकतो.
पुढील गोष्टी ठेवा लक्षात
स्वच्छ आणि निरोगी टाळू राहण्यासाठी नियमितपणे स्वच्छ धुणे गरजेचे आहे. ज्यामुळे केसांचे आरोग्य निरोगी राहील. यामुळे टाळू मुलायम राहील तसेच कोंडा कमी होईल. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होईल.