आरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे

पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम नावाच्या दुर्मिळ आजाराचे संशयित रुग्ण

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात

पुणे : पुणे शहरातील नागरिक सध्या एका दुर्मिळ आजाराचे अनेक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे ( Guillain Barre Syndrome (GBS)) चे 22 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी इंडियन मेडिकल काऊन्सिल ऑफ रिसर्च (ICMR-NIV) येथे पाठवण्यात आले आहेत. तेथील तपासणीअंती या आजाराचा निष्कर्ष निघेल.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पूना हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काही रुग्णांना दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संबंधित हॉस्पिटलमध्ये संशयित रुग्णांना दाखल करण्यात आल्यानंतर सिंहगड रोड परिसरातून, गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची काही प्रकरणं पुणे महानगरपालिकेकडे नोंदवली गेली आहेत. शहरातील या दुर्मिळ विकाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे पालिकेतर्फे बाधित भागात एक टीम पाठवण्यात येणार असल्याची माहितीही समोर आली आहे. गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे नक्की काय हे जाणून घेऊया.

हेही वाचा  :  सोनं व चांदी खरेदी करायचा विचार करताय? तर जाणून घ्या आजचे दर 

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे काय ?

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे. दरवर्षी १ लाख लोकांमध्ये तो एका व्यक्तीला होतो. याचे निदान गुंतागुंतीचे असते. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या या आजाराच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी 20 टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात, अशी माहिती समोर आली आहे.

जीबीएस या आजाराचे पहिले लक्षण म्हणजे अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येणे. या आजाराचे नेमके कारण काय ते सध्या माहीत नाही. गुइलेन बॅरे सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे. पण गुइलेन बॅरे सिंड्रोमला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणतात. गुइलेन बॅरे सिंड्रोम दोन तृतीयांश रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया किंवा लसीकरणानंतर सात दिवस ते पाच आठवड्यानंतर दिसून आले. पण काही लोकांमध्ये हे संक्रमण ट्रिगरसारखे कार्य करते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button