शिक्षणामुळे मृत्यूचा धोका कमी, आयुष्यही वाढतं; अभ्यासात नवी माहिती समोर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Untitled-design-11-780x470.jpg)
Study : उच्च शिक्षित लोकांचे वय इतरांपेक्षा कमी वेगाने वाढतं आणि अशा व्यक्ती अधिक काळ जगण्याची शक्यता जास्त असते, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. JAMA नेटवर्क ओपन जर्नलमध्ये १ मार्च रोजी या संदर्भातील एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या पथ-ब्रेकिंग अभ्यासात, असं दिसून आलं आहे की, उच्च शिक्षणामुळे मृत्यूचा धोका कमी होतो, यासोबतच उच्च शिक्षित व्यक्तींमध्ये वृद्धत्वाचा वेगही कमी आहे.
वडीलधाऱ्या व्यक्ती नेहमी आपल्याला शिक्षण घेण्याचे फायदे सांगतात. उच्च शिक्षण घेतल्याने भविष्य सुखकर होते, असं आतापर्यंत प्रत्येकाने ऐकलं असेल, पण याचा तुमच्या आयुष्यावरही खूप मोठा परिणाम होतो. उच्च शिक्षणाचा आयुष्यावर परिणाम खूप चांगला परिणाम होतो असं एका अभ्यासात समोर आलं आहे. उच्च शिक्षणामुळे तुमचं आयुष्य वाढतं, असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे. या संशोधनानुसार, उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीचं वय हळूहळू वाढतं आणि ते जास्त काळ जगतात, असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे.
हेही वाचा – उन्हाळ्यात थंड पाणी पिताय तर वेळीच सावध व्हा! होऊ शकतं मोठं नुकसान
न्यूयॉर्क शहराउन्हाळ्यात थंड पाणी पिताय तर वेळीच सावध व्हा! होऊ शकतं मोठं नुकसानतील कोलंबिया युनिव्हर्सिटी मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील शास्त्रज्ञांच्या टीमने हा अभ्यास केला आहे. संशोधनाचे वरिष्ठ संशोधक डॅनियल बेल्स्की यांनी सांगितलं की, ‘आम्हाला बऱ्याच काळापासून माहित आहे की ज्या लोकांचे शिक्षण उच्च स्तरावर आहे ते अधिक आयुष्य जगतात. पण ते कसे घडते हे शोधण्यात अनेक आव्हाने आहेत.’ शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणे निरोगी दीर्घायुष्यासाठी योगदान देतील का, याबाबत अधिक संशोधन सुरु आहे, असं बेल्स्की यांनी एका वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, प्रत्येक दोन अतिरिक्त वर्षांच्या शालेय शिक्षणामुळे वृद्धत्वाची गती २ ते ३ टक्के कमी होते. सोप्या भाषेत सांगायचं तर याचा अर्थ असा की, उच्च शिक्षणामुळे वृद्धत्वाचा दर कमी होऊन दिर्घायुषी होण्यास मदत होते. अभ्यासाच्या अहवालानुसार, उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीमध्ये सरासरी-शिक्षित व्यक्तीपेक्षा मृत्यूचा धोका १० टक्के कमी असतो.
या संशोधनात, शास्त्रज्ञांनी फ्रेमिंगहॅम हार्ट स्टडीमधील माहितीचा वापर करण्यात आला. हार्ट स्टडी हा अभ्यास १९४८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या फ्रेमिंगहॅम, मॅसॅच्युसेट्सच्या रहिवाशांच्या पिढ्यानपिढ्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी सुरू करण्यात आला होता. या व्यक्तींच्या वृद्धत्वाचा दर मोजण्यासाठी, संशोधकांनी अभ्यासात सहभागी व्यक्तींच्या अनुवांशिक डेटाची तपासणी केली, वृद्धत्वासाठी स्पीडोमीटर सारख्या अनुवांशिक चाचणीचा वापर केला.