हिवाळ्यात दही खालल्यानं खरंच वजन कमी होतं? जाणून घ्या फायदे!
![Does eating curd in winter really reduce weight? Learn the benefits!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/535166-1386696-curd1-780x470.webp)
दह्याशिवाय कोणतंच डाएट प्लॅन पूर्ण होत नाही. दह्यामुळे पचन सुधारतं तसेच वजन आटोक्यात ठेवण्यासही मदत होते. दही वजन घटवण्यास तसेच आटोक्यात ठेवण्यास मदत करते. दह्यातील कॅलशियम घटक पेशींमध्ये कोलेस्ट्रेरॉलची तयार होत नाही. घातक कोलेस्ट्रेरॉलची निर्मिती वाढली तर लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाबाची समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दही खाणं कधीही चांगलं…
दही (Curd) हा अनेक लोकांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. काहींना ते साखरेसोबत आणि रायत्याच्या स्वरूपातही खायला आवडतं. दह्याचे आरोग्यासाठी फायदेही आहेत. दह्याबाबत अनेक गैरसमज आहेत. जसं की लोकांना वाटतं… दही थंड आहे, त्यामुळे हिवाळ्यात लोकं दही खायला घाबरतात. मात्र, आयुर्वेदानुसार दही प्रकृतीनुसार उष्ण असतं. त्यामुळे हिवाळ्यात तुमच्या शरिराला त्याचा फायदाच होतो.
जेवणात किंवा जेवल्यानंतर तुम्ही वाटीभर दही खाणे हितकारी आहे किंवा जेवण बनवतानाही त्याचा वापर केला जाऊ शकतो. फळांचे किंवा भाज्यांचे सॅलड करून त्यात दही मिसळता येऊ शकतं. काकडी, टोमॅटो, कांदा, बुंदी किंवा बटाट्याचा रायता दह्यासोबत बनवून खाऊ शकता. त्यावर तुम्ही पुदिना किंवा कोथिंबीर देखील टाकू शकता.
दरम्यान, दह्याच्या पोषक तत्वांबद्दल बोलायचं झालं तर दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-12, व्हिटॅमिन बी-2, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक आढळतात. त्यामुळे दही दररोजच्या खाण्यात असेल तर तुमचंही आरोग्य चांगलं राहू शकतं.