breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#Covid-19: मृतांची संख्या लपवण्यासाठी योगी सरकार मृतदेह नदीत टाकून देत आहे; खासदाराचा आरोप

उत्तर प्रदेश |

उत्तर प्रदेशमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच राज्यामध्ये करोना मृतांची आकडेवारी सरकारकडून लपवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मगंळवारी गाजीपूर जिल्ह्यामध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने अज्ञात व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारच्या करोना मृतांच्या आकडेवारीसंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. याच विषयावरुन राज्यसभेचे खासदार आणि आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर निशाणा साधाला आहे. हा भाजपाचा न्यू इंडिया आहे, जिथे जिवंत असताना उपचार मिळत नाहीत आणि मृत्यू झाल्यानंतर नदीमध्ये बेवारस म्हणून मृतदेह फेकून दिले जातात, अशा शब्दांमध्ये सिंह यांनी टीका केली आहे. करोना मृतांचा आकडा लवपण्यासाठी योगी सरकार नदीमध्ये मृतदेह फेकून देत असल्याचा आरोप सिंह यांनी केलीय.

सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, या सरकारच्या कार्यकाळामध्ये करोनामुळे मरण पावणाऱ्यांवर पारंपारिक पद्धतीने योग्य प्रकारे अंत्यसंस्कार केले जात नाहीत. कानपुरमध्ये गंगेच्या किनाऱ्यावर हजारहून अधिक जणांचे मृतदेह पुरण्यात आल्याचा दावा सिंह यांनी केलाय. अशापद्धतीने अंत्यसंस्कार केल्याने गंगा नदीच्या किनाऱ्यावरील परिस्थिती भयानक झाली आहे, असंही सिंह म्हणाले. आता गाजीपूरमध्येही मोठ्याप्रमाणात असे बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. याचाच संदर्भ घेत सिंह यांनी, “कानपूर, उन्नाव, गाजीपूरमध्ये नदीतून वाहत आलेल्या मृतदेहांवरुन हे सांगता येतय की योगी सरकार करोनामुळे मरण पावणाऱ्यांवर अंत्यस्कार करत नाहीय. करोनामुळे मरण पावलेल्यांचे मृतदेह बेवारस म्हणून नदी, नाल्यांमध्ये फेकून दिलं जात आहे,” असं म्हटलंय. सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकार जनतेला चुकीची माहिती देत असल्याचा आरोप केलाय. उत्तर प्रदेशमधील सरकार करोना साथीच्या कालावधीमध्ये सामान्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्यासमोर खोटी आकडेवारी ठेऊन त्यांची फसवणूक करण्याचं काम करत आहे, अशी टीका सिंह यांनी केलीय. तसेच उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी पाच हजारांची मदत घेण्याची घोषणा केलीय. मात्र समोर आलेल्या घटनांमधून योगी सरकार केवळ कागदावर काम करत असून प्रत्यक्षात काहीच घडत नसल्याचा टोलाही सिंह यांनी लगावला आहे.

वाचा-  कोविड काळात बजाज ऑटोचा मोठा निर्णय! २ वर्षांपर्यंत पगार, मुलांसाठी शिक्षण, ५ वर्षांचा आरोग्यविमा!

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button