केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! एलपीजी सिलेंडरवर मिळणार सबसिडी

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशातच केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने LPG गॅसवर सबसिडी जाहीर केली आहे. उज्ज्वला योजना लाभार्थ्यांच्या एलपीजी सिलिंडर सबसिडीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर २०० रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान १४.२ किलोच्या १२ एलपीजी सिलेंडरवर देण्यात येणार आहे.
१ एप्रिल म्हणजेच नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एलपीजी सिलेंडर स्वस्त होणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे १.६ कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.
केंद्र सरकारकडून प्रत्येक सिलिंडरवर २०० रुपयांचे अनुदान मिळते. म्हणजेच केंद्र सरकारकडून एका वर्षात सबसिडीच्या स्वरूपात लाभार्थ्यांना २४०० रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.





