breaking-newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडी
#Covid-19: ब्रिटनमध्ये १२-१५ वर्षे वयोगटासाठी लशीला मान्यता
![The first dose will be given to 70% of adults in 7 states of the country by August](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Corona-Vaccination-Covid.jpg)
लंडन |
ब्रिटनमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी फायझर/बायोएनटेकच्या लसीला ब्रिटनच्या औषध नियामकांनी मान्यता दिली आहे. या वयोगटासाठी ही लस सुरक्षित असून त्याचे धोक्यापेक्षा फायदेच अधिक आहेत, असे नियामकांनी म्हटले आहे. युरोपीय समुदायाच्या औषध नियामकांनी या लसीला त्यापूर्वी मान्यता दिली होती.
या वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आहे का याचा आढावा घेण्यात आल्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली, असे औषधे आणि आरोग्यविषयक उत्पादने नियामक यंत्रणेने म्हटले आहे. अमेरिकेतही फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आली असून तेथे १२-१५ वयोगटासाठी लसीकरण सुरू आहे. अनेक देशांनी १२-१५ वयोगटासाठी लसीला मान्यता दिली आहे.