breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: विषाणूंचा आकार गोल

पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत केरळातील नमुने तपासण्यात आले. त्यानुसार भारतातील कोविड १९ विषाणू हा चीनच्या वुहानमधील विषाणूशी ९९.९८ टक्के जुळणारा आहे. अजून तो उत्परिवर्तित होत असून त्यावर औषधे व लसी बनवता येतील. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी रोगनिदान विभागाचे उपसंचालक डॉ. अतनु बसू यांनी सांगितले की, “विषाणूचा अभ्यास केला असता त्याचा कण हा ७५ नॅनोमीटरचा दिसतो, त्याचा काटा हा ग्लायकोप्रोटिनचा असून त्यामुळेच तो यजमान पेशीत घुसू शकतो.

केरळातील मुलीच्या स्राव नमुन्यातील ५०० मायक्रोलिटर भागातून हा विषाणू वेगळा काढण्यात आला व त्याची चाचणी पॉलिमरेज अभिक्रियेने करण्यात आली. त्यातील द्रव भाग वेगळा काढून १ टक्के ग्लुटारेल्डीहाइडच्या मदतीने व नंतर कार्बन आवरण असलेल्या तांब्याच्या गाळणीतून गाळला गेला. त्यानंतर सोडियम फॉस्फोट्युनिस्टिक आम्लाचा वापर करण्यात आला. नंतर १०० केव्हीच्या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीच्या मदतीने कॅमेरा लावून त्याच्या प्रतिमा घेण्यात आल्या. हा विषाणू ७०-८० नॅनोमीटरचा असून त्यात १५ नॅनोमीटरचे कवच आहे. अशा सात विषाणू कणांचे चित्रण यात करण्यात आले. या विषाणूंचा आकार गोल दिसून आला आहे.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button