#CoronaVirus: मुंबईत आज आणखी 1 हजार 622 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
![Worrying! 49,447 in the state and 9090 in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/coronavirus-in-lucknow.jpg)
मुंबई: मुंबईत आज आणखी 1 हजार 622 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 48 हजार 569 वर पोहचलेली आहे. यापैंकी 7 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झालेले आहेत.
कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत.