breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: भारतात करोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे ‘हे’ औषध वापरण्याची परवानगी

देशभरात करोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर करोनाला रोखण्यासाठी राष्ट्रीय टास्क फोर्सने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध वापरण्याची शिफारस केली आहे. COVID-19 चा मुकाबला करण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापन केली आहे. इकोनॉमिक टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा सरसकट वापर करता येणार नाही. इर्मजन्सीच्या प्रसंगात हे औषध वापरता येईल. राष्ट्रीय टास्क फोर्सच्या या शिफारशीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) मंजुरी दिली आहे.

प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हायड्रोक्सी क्लोरोक्वीन हे औषध करोना व्हायरस विरोधात प्रभावी ठरत असल्याचे अ‍ॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. १५ वर्षाच्या आतील मुलांवर हे औषध वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अ‍ॅडव्हायजरीनुसार नोंदणीकृत डॉक्टरने प्रिस्क्रिप्शनवर लिहिले असेल तरच हे औषध मिळू शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button