breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: धक्कादायक! मुंबईतलं हे हॉस्पिटल बनलं कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं केंद्र, वाचा सविस्तर…
मुंबई: राज्यात कोरोनाचा कहर वाढत असताना मुंबईत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. मुंबईचं केईएम रुग्णालय हे कोरोना रुग्णांच्या मृत्यू केंद्र बनलेलं आहे. गेल्या 36 दिवसांत 460 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर ऑक्सिजन अभावी रुग्णांचा बळी जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे आम्हाला रुग्णालयांची भीती असल्याची प्रतिक्रियाही नागरिकांकडून देण्यात आली आहे.
राज्यात कोरोना विषाणूमुळे दररोज बऱ्याच लोकांचा मृत्यू होत आहे. पण कोरोना बाजूला मुंबईत ऑक्सिजनच्या अभावामुळेच रुग्णालयात मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. केईएम रुग्णालयाची हीच स्थिती आहे असा आरोप रूग्णांकडून करण्यात आला आहे. पण असा कोणताही प्रकार रुग्णालयात घडत नसल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाकाडून देण्यात आली आहे.