Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीपुणे
#CoronaVirus: चिंताजनक! कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचणीला भारतातही स्थगिती; Serum Institute ची माहिती
पुणे: सीरम इंस्टीट्युटने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेनेकाच्या कोविशिल्ड लसीची मानवी चाचणी भारतातही थांबवली आहे. या लसीच्या चाचण्या 17 वेगवेगळ्या ठिकाणी चालू होत्या. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या पुढच्या आदेशापर्यंत या चाचण्यांना तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. अशी माहिती सीरम इंस्टीट्युटकडून देण्यात आलेली आहे.
आम्ही परिस्थितीची पाहणी करत आहोत आणि त्यासाठी भारतातील लसीची मा्नवी चाचणी थांबवण्यात आलेली आहे. आम्ही Drug Controller General of India च्या नियमांचे पालन करत आहोत. त्यामुळे आम्ही लसीच्या पुढील चाचण्या करु शकणार नाही, असे सीरम इंस्टिट्युटकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.