#CoronaVirus:जगातील 188 देशांमध्ये कोरोनाचे 3.50 लाख लोकांचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/test-2.gif)
मुंबई : जगातील 188 देशांमध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. जगभरात मृतांची संख्या 3.50 लाखांवर गेली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 55 लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 22 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत ही एक दिलासा देणारी बाब आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी पर्यंत संपूर्ण जगात एकूण कोरोना रूग्णांची संख्या 55 लाख 89 हजार 626 वर पोहोचली आहे. त्यापैकी 3 लाख 50 हजार 453 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 22 लाख 86 हजार 879 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.
अमेरिकेत कोरोनाहून आतापर्यंत 98 हजार 913 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरे स्थानावर युनायटेड किंगडम आहे. येथे 37 हजार 130 लोकांनी आपला जीव गमावला. इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे, येथे 32 हजार 955 लोकांनी आपली जीव गमवला आहे.
याशिवाय फ्रान्समध्ये 28 हजार 533 लोकांचा मृत्यू, स्पेनमध्ये 27 हजार 177, ब्राझीलमध्ये 24 हजार 512, बेल्जियममध्ये 9 हजार 334, जर्मनीमध्ये 8 हजार 372, मेक्सिकोमध्ये 8 हजार 134, इराणमध्ये 7 हजार 508 लोकांचा मृत्यू झाला आहे.