लवंग खाल्ल्याने किंवा लवंगाचे पाणी प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे
रोज रात्री लवंग खाऊन झोपल्यास काय होते?
मुंबई : किचनमध्ये असणारे मसाले फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नसतात तर आरोग्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे असतात. असे अनेक मसाले आहेत ज्या अनेक आजारांसाठी रामबाण उपाय ठरतात. गरम मसाल्यांमधील एक म्हणजे लवंग. गरम मसाल्यातील लवंग बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये वापरली जाते. लवंगमुळे जेवणाची चव वाढते आणि आरोग्यासही लाभ मिळतात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात. अमेरिकेतील एका प्रसिद्ध डॉक्टरने लवंग खाण्याचे फायदे सांगितले आहेत,जे जाणून घेतल्यास तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
रात्री लवंग खाणे किंवा लवंगाचे पाणी पिण्याचे फायदे काय होतात
1. पचनप्रक्रिया सुधारते
झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास किंवा लवंगाचे पाणी प्यायल्यास अपचन आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतील.
2. चांगली झोप येण्यास मदत होते
लवंगमध्ये अशा काही नैसर्गिक तत्त्वांचा समावेश आहे, ज्यामुळे तणाव कमी होऊन मेंदू शांत होण्यास मदत मिळते आणि झोप चांगली येईल.
3. यकृत डिटॉक्स होईल
लवंगातील औषधी गुणधर्मामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर सहजरित्या फेकले जाण्यास मदत मिळेल. रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्ल्यास लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत मिळेल.
हेही वाचा – भारत-अमेरिकेत शस्त्रांसंबंधी मोठा करार ; ९३ दशलक्ष डॉलर्सच्या लष्करी पॅकेजला मंजुरी
4. सर्दी-खोकला दूर होईल
लवंगाची प्रकृती उष्ण आहे आणि यातील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्मामुळे घशातील खवखव, खोकला-सर्दी, कफच्या समस्येतून सुटका मिळेल
5. दात आणि हिरड्यांसाठी फायदेशीर
रात्री झोपण्यापूर्वी लवंग चावून खाल्ल्यास तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल. तसेच तोंडाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. विशेषतः दात दुखीपासून आराम मिळू शकतो.
6. हृदय आणि रक्ताभिसरण प्रक्रिया सुधारेल
लवंगाचे पाणी प्यायल्यास शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल आणि यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल.
7. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होईल
लवंगमधील अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत मिळेल.
लवंगाचे पाणी कस तयार करावे?
चार ते पाच लवंग एक कप पाण्यात उकळा. उकळ आल्यानंतर पाच मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर पाणी गरम करावे. गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे. लवंगाचे पाणी तयार झाल्यानंतर जवळपास एक तासानंतर पाणी प्यावे झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी लवंगाचे पाणी प्यावे. यामुळे काही दिवसांत शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतात. मर्यादित स्वरुपातच लवंगाचे पाणी प्यावे.




