Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

‘भारत बायोटेक’च्या लस आयातीस ब्राझीलकडून नकार

 ‘भारत बायोटेक’ कंपनीत तयार केल्या जात असलेल्या कोव्हॅक्सिन लशीला आयातीची परवानगी देण्यास ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने नकार दिला आहे. या कंपनीच्या प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना दिसत नाही, असा शेरा त्यांनी मारला आहे. आयात बंदीच्या निर्णयावर ‘भारत बायोटेक’ कंपनीने म्हटले आहे की, प्रकल्पातील काही घटकांच्या अटी पूर्ण केल्या जातील.

ब्राझील सरकारने २ कोटी लस मात्रांची मागणी आयातीच्या माध्यमातून नोंदवली होती, तो प्रस्ताव अजून बाद झालेला नाही. अजूनही ब्राझील ती लस आयात करेल फक्त त्यासाठी आम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. ब्रेसिसा मेडिकॅमेंटॉस या कंपनीशी हा करार झाला होता. उत्कृष्ट उत्पादन पद्धतींचे अनुपालन न केल्याने ब्राझीलने ही आयात थांबवली आहे, असे ‘अ‍ॅनव्हिसा’ने संकेतस्थळावर म्हटले आहे

जर्मनीत ऑक्सफर्ड लशीच्या वापराला स्थगिती

रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या कारणास्तव काही वयोगटांसाठी जर्मनी व कॅनडा यांनी या लशीचा वापर थांबवला आहे. या लशीचे उत्पादन भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ‘कोव्हिशिल्ड’ नावाने केले आहे.

वाचा- अन्नप्रक्रिया उद्योगाला ११ हजार कोटींचे प्रोत्साहन

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button